Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव ते मनमाड राष्ट्रीय महामार्गासाठी २५२ कोटी रूपयांचा निधी

जळगाव प्रतिनिधी । पाचोरा, भडगाव व चाळीसगावमार्गे जळगाव ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग निर्माण मंत्री नितीन गडकरी यांनी यांनी २५२ कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग निर्माण मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील विविध राष्ट्रीय महामार्गांसाठी भरीव निधीची घोषणा केली आहे. या संदर्भात त्यांनी प्रत्येक महामार्गासाठी स्वतंत्र ट्विट करून माहिती दिली आहे. यातील वैशिष्ट्य म्हणजे पाचोरा, भडगाव व चाळीसगावमार्गे जळगाव ते मनमाड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ जे या हायवेसाठी २५२ कोटी रूपयांचा निधी प्रदान करण्याची घोषणा केली आहे.

जळगाव ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा पहिला टप्पा आता जवळपास पूर्णत्वाला आहे. यात जळगाव ते चाळीसगावच्या दरम्यानच्या चौपदरीकरणाचे काही पूल वगळता काम पूर्ण झालेले आहे. तर यापुढील कामालाही आता गती मिळणार आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जळगाव ते मनमाड महामार्गासाठी भरीव निधीची तरतूद केली असून यामुळे प्रगतीचे एक पुढील टप्पा गाठला जाणार असल्याची माहिती खासदार उन्मेषदादा पाटील यांनी दिली असून त्यांनी गडकरी यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version