Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोगस रेल्वे तिकिट विक्री करणारा आरपीएफच्या ताब्यात; रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

जळगाव प्रतिनिधी । डमी आयडी कार्डचा वापर करून रेल्वे तिकिट विक्रीचा काळाबाजार करणार्‍या एकाला आज शहरातील तेली चौक परिसरातून आरपीएफच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या माध्यमातून तिकिटांचा काळाबाजार करणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता बळावली आहे.

आरपीएफच्या पथकाने आज रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍याला अटक केली आहे. बोगस रेल्वे तिकीट विक्रीचा काळाबाजार करणार्‍या संशयिताला आज आरपीएफ पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. ही कारवाई दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील जुने जळगाव भागात असणार्‍या तेली चौकात करण्यात आली. यात संदीप प्रोव्हिजनचा संचालक पंकज आनंदा बारी या तरूणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

एक व्हॅलीड आयडी असतांना दुसर्‍या डमी आयडी वापरून रेल्वे तिकीटांची अफरातफर करत असल्याची माहिती रेल्वे सायबर सेल ला मिळाली त्यानुसार आज कारवाई केली असल्याची माहिती रेल्वे स्टेशन पोलीस निरीक्षक सी.एस.पटेल यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीला दिली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संशयिताची कसून चौकशी सुरू होती. तर जळगाव आरपीएफमध्ये याबाबत गुन्हे नोंदण्याची प्रक्रिया देखील सुरू होती.

Exit mobile version