Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापालिकेतील बंडखोर गटाच्या सदस्यांना दिलासा : सुप्रीम कोर्टाचे निर्देश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपमधून फुटून शिवसेनेची साथ देऊन महापालिकेत सत्तांतर घडविणार्‍या सदस्यांना आज सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.

 

या सर्ंभात वृत्त असे की, २०१८  साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दणदणीत बहुमत मिळाले होते. या पक्षाचे तब्बल ५७ सदस्य निवडून आले होते. यातील, २७ सदस्यांनी वेगळा गट स्थापन करून शिवसेनेच्या मदतीने मार्च २०२२ मध्ये सत्तांतर घडवून आणले होते. यानंतर भारतीय जनता पक्षाने या सदस्यांना अपात्र करावे या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. यात उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांनी यावर निर्णय द्यावा असे निर्देश दिले होते. विभागीय आयुक्तांकडे यावरील सुनावणी ही शेवटच्या टप्प्यात पोहचली असतांनाच महापौर जयश्रीताई महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यात, उच्च न्यायालयाच्या ऑर्डरला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

दरम्यान, ही स्थगिती आज समाप्त होत असतांनाच सुप्रीम कोर्टाने आज याची मुदत वाढवून दिली आहे. यानुसार आता विभागीय आयुक्तांकडे सुरू असलेली सुनावणी ही चार आठवड्यांपर्यंत स्थगित करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिल्याची माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली आहे. यामुळे महापालिकेतील बंडखोर गटाला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.

 

Exit mobile version