Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फसवणूक प्रकरणातील संशयिताला पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । शासकीय योजनेच्या अनुदानात तब्बल ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याततील संशयित दीपक नीळकंठ जावळे याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी दीपक नीळकंठ जावळे (२७,रा. नितीन साहित्या नगर, सुप्रीम कॉलनी) याला अटक केली. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य उद्योजक विकास अभियान अंतर्गत शैक्षणिक संस्था सुरू करून देण्यासाठी भूषण गणेश बक्षे (वय २७, रा. पार्वती काळे नगर, मोहाडी रोड, जळगाव) याने भारती गजेंद्रसिंग परदेशी (रा.रायपुर,ता.जळगाव) यांच्याकडून आवश्यक ते कागदपत्र घेतले व संस्थेची नोंदणी केली.

या प्रशिक्षण संस्थेला मिळणारे ४७ लाखाचे शासकीय अनुदान परस्पर लाटून घेतले होते, अशा आशयाची तक्रार भारती परदेशी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार १ फेब्रुवारी २०१९ रोजी भूषण गणेश बक्षे, शितल भगवान पाटील, भरत अरविंद भंगाळे, मोहिनी भरत भंगाळे, राजेंद्र नरेंद्र नारखेडे व भगवान दगडू पाटील या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

यानंतर यात दिपक निळकंठ जावळे यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. तपासअधिकारी पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील यांनी संशयित दिपक त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्या. अक्षी जैन यांनी संशयितास २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version