Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलांसाठी योग शिबीर उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । येथील विश्‍वमंगल निसर्गोपचार केंद्र आणि योग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी पाच दिवसांचे ऑनलाईन योग शिबीर उत्साहात पार पाडले.

याबाबत वृत्त असे की, विश्‍वमंगल निसर्गोपचार केंद्र आणि योग समन्वय समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने म११ जून ते १५ जून महिलांसाठी पाच दिवसीय शिबिर घेण्यात आले

या शिबीराला प्रमुख पाहुणे* म्हणून डॉ. सौ. जयंती चौधरी व कृणाल महाजन उपस्थित होते डॉ. जयंती चौधरी यांनी योग व प्राणायाम कसा आवश्यक आहे हे सांगितले. योग शिबिराला योग प्राध्यापक सौ. चित्रा महाजन व कविता चौधरी यांनी मार्गदर्शन केले सर्व प्रात्यक्षिकांसह योग व प्राणायाम करून घेतला.

सूत्र संचालन सौ. मनिषा चौधरी यांनी केले. आभार सौ. नेहा तळले यांनी मानले. योग शिक्षक रोहन चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभलयाची माहिती विश्‍व मंगल योग निसर्गोपचार केंद्राच्या संचालिका चित्रा महाजन यांनी दिली आहे.

Exit mobile version