Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबादला नगरपंचायतीची घोषणा; जल्लोषात स्वागत

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या नशिराबादला आता नगरपंचायत होणार असून याबाबत नगरविकास खात्याने घोषणा केली आहे. या निर्णयाचे शहरातून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

नशिराबाद ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली असताना दुसरीकडे नगरविकास विभागाकडून नगरपंचायत रूपांतरणाची कार्यवाही सुरू होती. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक तीन महिने पुढे ढकलावी, अशी मागणी नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत एक दिवसावर असताना नशिराबाद नगरपंचायत झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी येत्या तीन महिन्यांत या नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे.

दरम्यान, नशिराबाद ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने गावात फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. या निर्णयाचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील व माजी सरपंच पंकज महाजन यांच्यासह इतरांनी स्वागत केले आहे.

Exit mobile version