Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लेवा एज्युकेशन युनियनच्या अध्यक्ष पदी नंदकुमार बेंडाळे

जळगाव प्रतिनिधी । लेवा एज्युकेशन युनियन संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाच्या सभेत सर्वानुमते प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांची लेवा एज्युकेशन युनियनच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

डॉ. सुभाष चौधरी यांनी लेवा एज्युकेशन युनियन अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अध्यक्षपदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या नावाची चर्चा होती. अखेर १३ डिसेंबर रोजी लेवा एज्युकेशन युनियन संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाची सभा पार पडली. यामध्ये बेंडाळे यांची लेवा एज्युकेशन युनियनच्या अध्यक्षपदी सर्वानूमते निवड करण्यात आली आहे.

खान्देशात मुलींसाठी स्वतंत्रपणे केजी टू पीजी पर्यंत शिक्षण देणारी संस्था असा नावलौकिक आहे. या संस्थेची सातत्याने भरभराट होत असून भविष्यात या संस्थेला स्वायत्त संस्था करण्याचा त्यांचा मानस आहे. संस्थेत शिक्षण घेणार्‍या मुलींना विविध कौशल्यावर आधारित शिक्षण देऊन त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करता यावा, यासाठी केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य सरकार व इतर संस्थांच्या या माध्यमातून नवनवीन कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू होतील, असे त्यांनी या निमित्ताने सांगितले. समाजातील मुलींना ‘लोकल टू ग्लोबल’ या दृष्टिकोनातून सक्षम बनवण्यासाठी समाजातील मान्यवर व्यक्तींचे सहकार्य घेत संस्थेचा विविध क्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी आराखडा तयार करून सर्वांच्या सहकार्याने अंमलबजावणी करू असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version