Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परिवर्तनतर्फे साहित्य अभिवाचन महोत्सव

जळगाव प्रतिनिधी । परिवर्तन संस्थेतर्फे आजपासून ऑनलाईन साहित्य अभिवाचन महोत्सव आयोजन करण्यात आला असून यात मान्यवर साहित्यीक सहभागी होणार आहेत.

परिवर्तन संस्थेतर्फे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २६ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत ऑनलाईन साहित्य अभिवाचन महोत्सव आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाची सुरूवात साहित्यिकांच्या चर्चासत्राने होणार आहे. पहिल्या दिवशी २५ फेब्रुवारीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ कादंबरीकार प्रविण बांदेकर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी २७ फेब्रुवारी रोजी जयंत पवार लिखित तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य या कथेचं अभिवाचन अतुल पेठे हे करणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी बंगाली साहित्यात व जागतिक स्तरावर गाजलेल्या बिभुतीभूषण बंदोपाध्याय लिखित पाथेर पांचाली या कादंबरीचे अभिवाचन, १ मार्च रोजी शंभू पाटील लिखित गांधी नाकारायचा आहे पण कसा? या नाटकाचे अभिवाचन, २ मार्च रोजी कवी अशोक कोतवालांची कविता परिवर्तनचे कलावंत सादर करतील. यानंतर ३ मार्च रोजी चंद्रशेखर फणसळकर लिखित आमचा पोपट वारला या कथेचं अभिवाचन अतुल पेठे करतील. महोत्सवाचा समारोप ४ मार्च रोजी भाषा संस्कृतीवरील चर्चेने होणार आहे.

यंदाचं वर्ष हे परिवर्तनाच्या दशकपूर्तीचं आहे. या ऑनलाईन अभिवाचन महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी रसिकांना लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी विनोद पाटील, प्रा. मनोज पाटील, नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, होरिलसिंग राजपूत, राहुल निंबाळकर, वसंत गायकवाड, मंगेश कुलकर्णी, डॉ. किशोर पवार, प्रतिक्षा कल्पराज, मोना निंबाळकर यांचे सहकार्य लाभत आहे.

Exit mobile version