Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सौ. जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांनी स्वीकारला पदभार

जळगाव राहूल शिरसाळे । नवनिर्वाचीत महापौर सौ. जयश्री सुनील महाजन Jayshri Mahajan आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज आपापल्या पदांचा कार्यभार सांभाळला. याप्रसंगी शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

नुकत्याच झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सौ. जयश्री सुनील महाजन Jayshri Mahajan आणि कुलभूषण पाटील यांनी दणदणीत विजय संपादन केला. मूळच्या शिवसेनेच्या गटाला भाजपमधील फुटीर गट आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी मतदान केल्यामुळे भाजपला पहिल्यांदाचा महापालिकेवर एकहाती सत्ता मिळाली आहे. दरम्यान, महापालिकेच्या स्थापनेला १८ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचीत्य साधून आज नवनिर्वाचीत महापौर आणि उपमहापौर यांनी सतराव्या मजल्यावरील कार्यालयात आपापल्या पदांचा कार्यभार सांभाळला.

महापौर आणि उपमहापौर यांनी आपल्या पदांचा कार्यभार सांभाळण्याआधीच शिवसैनिकांनी परिसरात जय्यत तयारी करून ठेवली होती. काल सायंकाळपासूनच परिसर भगव्या रंगात रंगल्याचे दिसून आले. या भागात ठिकठिकाणी भगवे झेंडे आणि नूतन महापौर व उपमहापौरांच्या स्वागतांचे फलक दिसून आले.

साधारणपणे अकरा वाजेच्या सुमारास नवनिर्वाचीत महापौर Jayshri Mahajan आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे आगमन होताच जय भवानी…जय शिवाजी या घोेषणांच्या गजरासह फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. तर महापौर आणि उपमहापौर यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. या दोन्ही मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आरती केली. यानंतर सतराव्या मजल्यावर दोन्ही मान्यवरांनी आपापल्या पदांचा कार्यभार सांभाळला.

याप्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर ललीत कोल्हे, गटनेते अनंत जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक, नितीन बरडे, इब्राहिम पटेल, अमर जैन, माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे, महिला आघाडीच्या शोभा चौधरी, सरिता माळी-कोल्हे आदींसह अन्य नगरसेवक व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. पहा याचे लाईव्ह कव्हरेज.

Exit mobile version