शिवसेना महानगरला अंतर्गत कलहाचे ग्रहण

जळगाव प्रतिनिधी । शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यावर तोफ डागून निलेश पाटील यांनी पक्षात सारेच काही आलबेल नसल्याचे दाखवून दिले आहे.

शिवसेनेच्या महानगर शाखेत अलीकडच्या दिवसांमध्ये गटबाजी असल्याचे दिसून आले होते. स्वतंत्र आंदोलन आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून जळगावकरांनी ही भाऊबंदकी अनुभवली आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही हा मुद्दा गाजला. सावंत यांनी शिवसेनेत कोणत्याही प्रकारची गटबाजी नसल्याचा दावा केला आहे. मात्र, नीलेश पाटील यांनी संपर्क प्रमुखांकडे थेट तक्रार करून महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नीलेश पाटील यांनी संजय सावंत यांना पत्र लिहले आहे. यात म्हटले आहे की, आपण दिलेल्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो, पण जळगाव शहर शिवसेनेमध्ये काय चालू आहे याची माहिती आपण सर्व शिवसेनेच्या शहरातील कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या भावना जाणून घेणे हे गरजेचे आहे. कारण जळगाव शहर महानगर प्रमुखांनी शिवसेना पक्ष त्यांच्या पुरता लिमिटेड करून ठेवली आहे. ते फक्त त्यांच्या मर्जीतील लोकांना आंदोलनाला व कार्यक्रमाला बोलवत असतात. सुरेशदादा जैन यांनी ४० वर्षे जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी व शहरातील लोक हितासाठीच काम केलं आहे व जिल्ह्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढवली. अशा लोकनेत्याचा फोटो सुध्दा महानगर प्रमुखंकडून शिवसेना पक्षाने दिलेल्या अँबुलन्सवर टाकण्यात आलेला नाही. तसेच शहरातील पक्ष कार्यालय गेल्या भरपूर दिवसांपासून बंदच आहे. पक्षातील बरेच कार्यकर्ते आपापल्या गल्लीत बसून पक्ष चालवण्याचा प्रयत्न करतो, आपल्या गल्लीतून शहराचे प्रश्‍न सुटत नसल्याचा टोल त्यांनी मारला आहे.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, गेल्या काही दिवसात लॉकडाऊन मुले जनतेची खूपच काम रखडली त्यावर कोणी समोर यायला तयार नाही आणि जर महानगर प्रमुख अशा पद्धतीने वागत असतील तर सर्व सामान्य शिवसैनिक कार्यकर्त्याच काय ? आणि महानगर प्रमुखांकडून जनतेच्या हिताच्या प्रश्‍नांसाठी आज पर्यंत महानगर प्रमुखांनी ठोस असे एकही आंदोलन केलेले नाही. आणि जर आम्ही लोकांच्या हितासाठीच आंदोलन व त्यांचे प्रश्‍न सोडवत असतो तर यात गैर काय आहे? जे शिवसेनेचे कार्यकर्ते लोक हिताच्या प्रश्‍नाच्या वाचा फोडण्यासाठी पुढे येत आहे त्यांना डावलण्याचा प्रयत्न या आपल्या आदेशातून होत आहे.

आपण या सर्व गोष्टींची शहानिशा करून शिवसेनेच्या नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय थांबवावा व जळगाव शहरात एक संघटीत शिवसेना निर्माण करावी असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.

तर शरद तायडे यांनी या आरोपांचे खंडन करत लॉकडाऊनमुळे व्यापारी संकुल बंद होते. परंतु, आता कार्यालय सुरू आहेत. तसेच अँबुलन्सवर सुरेशदादा जैन यांचा फोटा असल्याचेही शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांनी सांगितले आहे. तथापि, या प्रकारामुळे महानगर शिवसेनेतील दुफळी समोर आली आहे.

Protected Content