Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जीएसटी घोटाळ्याचे धागेदोरे जळगाव व पहूरपर्यंत

जळगाव प्रतिनिधी । बनावट पावत्यांच्या आधारे वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटीचा घोटाळा करण्याच्या प्रकरणाचे धागेदोरे हे जळगाव व पहूरपर्यंत जुडलेले असल्याचे जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या पथकाच्या छाप्यांमधून उघड झाले आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

याबाबत वृत्त असे की, वस्तू व सेवा कर विभागाच्या म्हणजेच जीएसटी क्रमांक काढून त्याद्वारे वस्तू विक्री अथवा खरेदी करताना कोट्यवधींचा कर प्रत्यक्ष न भरता तो कागदोपत्री दाखवून फसवणूक केली होती. या पार्श्‍वभूमीवर नाशिक विभाागाच्या तपासणीत जळगाव जिल्ह्यातील पहूर येथे अशाच प्रकारे जीएसटी विभागाची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. यातून गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने जळगाव व पहूरमध्ये छापेमारी केली.

या तपासणीत पहूर येथील स्टील उद्योगाच्या नावाने २० ते २५ कंपन्यांच्या माध्यामातून सुमारे ५०० कोटींहून अधिक बनावट पावत्यांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात पिंटू इटकरे, सुरेशचंद्र हुकुमचंद जाधवानी, ओम प्रकाश सचदेव (सर्व रा. जळगाव) आणि प्रवीण कुमावत, अशोक सखाराम सुरवाडे आणि कैलास भारूडे (सर्व रा. पहूर, ता. जामनेर) यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीत २० ते २२ कंपन्या बनावट आढळून आल्या. प्रत्यक्षात एकही स्टीलचा उद्योग अथवा कारखाना नाही. ते केवळ कागदोपत्री दाखवून सुमारे २३० कोटींचा जीएसटीचा घोटाळ केल्याचे समोर आले आहे.

Exit mobile version