Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव शहरात तरूणाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मैत्रीणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलात आलेल्या तरूणाला एका टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, मोहाडी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये मैत्रीणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक तरूण आला होता. तेव्हा अचानक आठ-दहा जणांच्या टोळक्याने त्याला हॉटेलात शिरून बेदम मारहाण केली. यानंतर त्याला रस्त्यावरही मारण्यात आले. हा विद्यार्थी परधर्मीय मैत्रीणीला वाढदिवस साजरा करण्यासाठी घेऊन आल्याने ही मारहाण करण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळता रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात जखमी झालेल्या शोएब पठाण या विद्यार्थ्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version