Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत १० डिसेंबरला पुढील सुनावणी

जळगाव प्रतिनिधी । घरकुल घोटाळ्यात गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा ठोठावलेल्या भाजपच्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या दाव्याची पुढील सुनावणी १० डिसेंबर रोजी होणार आहे.

घरकुल घोटाळ्यात गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा ठोठावलेल्या भाजपच्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. गटनेते भगत बालाणी, कैलास सोनवणे, दत्तात्रय कोळी, सदाशिव ढेकळे, लता भोईटे यांना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांना अपात्र करावे अशी मागणी यात करण्यात आली आहे. १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान पाचही नगरसेवक न्यायालयात हजर झाले होते. या वेळी नगरसेवकांनी वकील लावण्यासाठी मुदत मागितली आहे. तर महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या वकिलांनी कागदपत्र मिळवण्यासाठी मुदत मागितली होती. त्यानुसार आज सुनावणी झाली.

आजच्या सुनावणीत संबंधीत नगरसेवकांच्या वकिलांनी कागदपत्रे जमा करून पुढील तारीख मागितली. यानुसार न्यायाधिशांनी १० डिसेंबर ही तारीख दिलेली आहे. दरम्यान, या प्रकरणी पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता म्हणाले की, घरकूलमध्ये शिक्षा झालेल्या बहुतेक संशयितांना न्यायालयातून स्टे अर्थात स्थगिती मिळविली आहे. तथापि सुप्रीम कोर्टाच्या अलीकडच्या निकालानुसार कोणत्याही निकालावरील स्टे हा सहा महिन्यानंतर कायम राहत नाही. याचे कॅव्हेटमध्ये रूपांतर होते. यामुळे घरकूलध्ये स्टे घेतलेल्यांचे काय असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version