Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शोरूममधील विम्याच्या अपहार; दोघांवर गुन्हा दाखल

FIR

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील सरस्वती फोर्ड या शोरूममध्ये ग्राहकाचे पैसे जमा न करता अपहार करण्यासह मालकाची फसवणूक करून दमदाटी केल्या प्रकरणी कॅशिअर आणि महिला कर्मचार्‍याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, सरस्वती फोर्ड शोरुममधील दीपा बबन पाटील उर्फ दीपा विलास पाटील ही महिला इन्शुरन्स एक्सिकेटीव्ह म्हणून २ वर्षापासून व विवेक सूर्यवंशी हा कॅशियर पदावर दीड वर्षांपासून कामाला होते. दीपा पाटील हिने शोरुमच्या ग्राहकाकडून २३ ऑक्टोबर रोजी विम्याचे ३१,६६१ रुपये घेऊन कॅशियर सूर्यवंशींकडे जमा केले नाही. तसेच सूर्यवंशी यांनी विम्याचे पैसे जमा न करून घेताच ग्राहकाची पॉलिसी काढून दिली. हा सर्व प्रकार व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने याप्रकरणी एचआर मॅनेजर राहुल कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेच्या फिर्यादीवरूनही या आधी सरस्वती फोर्डचे मुकेश टेकवाणी व धवल मुकेश टेकवाणी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. कंपनीचे व्यवस्थापक धवल टेकवानी यांनी आधीच संबंधीत महिला ब्लॅकमेलींग करत असल्याचा आरोप केला आहे. यानंतर ती महिला व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Exit mobile version