Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर्ज देण्याच्या नावाखाली उत्तर प्रदेशच्या कंपनीकडून फसवणूक

FIR

जळगाव प्रतिनिधी । कर्ज देण्याच्या नावाखाली १४ ग्राहकांची उत्तरप्रदेशातील कंपनीने फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील नोएडा येथील शुभ जनलक्ष्मी कंन्सलटन्सी या कंपनीने लोकांना कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखविले होते. खंडेराव बापू महाले हे या कंपनीचे जिल्हा एजंट होते. त्यांनी जिल्ह्यातील ग्राहकांना भेटून कंपनीच्या कर्जाविषयी व जीएसटी ऑनलाइन भरण्याविषयी माहिती देत होते. ७ एप्रिल २०२० रोजी महाले यांनी महारू रघुनाथ गावंडे (रामनगर), अमर विलास पाटील (रा.ममुराबाद), मयूर श्रावण बारी (रा.रथचौक), ज्योती कुमोत चांगळे (रा.सिंधी कॉलनी), समशेद मोहम्मद शेख (रा.समतानगर), विशाल विनोद कोळी (रा.असोदा), गजानन लहूू कोळी (रा.खेडी), कैलास त्र्यंबक पालवे (रा.चिंचोली), संजय जाधव (रा.पथराड ता.धरणगाव), रामकृष्ण बारकू लंके ( रा.पथराड), विनोद बळवंत रोकडे (रा.चिंचोली), रंजना पंढरीनाथ बाविस्कर (रा.असोदा), कल्पना श्यामराव मोरे (रा.रामेश्‍वर कॉलनी) व भूषण वाणी (रा.रामेश्‍वर कॉलनी) या १४ ग्राहकांकडून एकूण २ लाख ८१ हजार ४५८ रुपये जमा केले. कंपनीच्या नोएडा येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ऑनलाइन जमा केले आहेत.

यानंतर रक्कम भरली तरी कुणाला कर्ज मिळाले नाही. यातच भरलेल्या रकमेविषयी वारंवार विचारणा केली असता व्यवस्थापक व इतरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी कन्सलटन्सीच्या जिल्ह्यातील एजंटने दिलेल्या फिर्यादीवरून व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवस्थापक दीपक चव्हाण, मानसी शर्मा व अनिल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

Exit mobile version