जळगाव सचिन गोसावी । कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा पर्यावरणावर अनुकुल परिणाम झाला असला तरी याचे काही साईड इफेक्टही झालेले आहेत. यासोबत आता अनलॉक होत असतांनाही सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. टी. इंगळे यांनी केले. लॉकडाऊन ते अनलॉक आणि पश्चातच्या कालखंडातील पर्यावरणीय बदलाबाबत ते लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
डॉ. एस. टी. इंगळे म्हणाले की, कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निसर्गावर अनुकुल परिणाम झाले आहेत. यात प्रामुख्याने वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषणांमध्ये लक्षणीय घट आल्याचे दिसून आले आहे. आता हळूहळू अनलॉक होत असतांना थोडी काळजी घेण्याची गरज आहे. यात महत्वाची बाब म्हणजे कोरोनाच्या कालावधीतील मेडिकल वेस्टची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचे प्रमुख आव्हान असणार आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात फटाके फोडण्याचे प्रमाण हे तुलनेत कमी झाले असले तरी यात अजून घट होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग यांच्यामुळे ऋतुचक्र बदलले असून यामुळे मान्सूनचे वेळापत्रक देखील बदलले असल्याची माहिती डॉ. एस.टी. इंगळे यांनी दिली.
खालील व्हिडीओत पहा डॉ. इंगळे नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2747043535569130