Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर्तव्यात कसूर : ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कर्तव्यात कसूर करण्यावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दोन ग्रामसेवकांना निलंबीत केले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कर्मचार्‍यांची झाडाझडती घेत धडक कारवाई केल्याने कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. धरणगाव येथे डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यात स्वच्छ भारत मिशन आणि घरकुल योजनेत कमी काम आढळून आले. या अनुषंगाने कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून तसेच सभेत उपस्थित मुद्दे व दप्तरात आढळून आलेल्या दिरंगाईमुळे आर. डी. पवार व बी. डी. बागूल या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. बोरगाव व वाघळूद येथील दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, डॉ. पंकज आशिया यांनी याच बैठकीत नांदेड, जांभोरे, रेल, सोनवद ,चावलखेडा, दोनगाव, वराड येथील येथील ग्रामपंचायतींच्या दप्तराची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत जळगाव तालुक्यातील उमाळे, पाथरी, शेळगाव, कुसुंबा, वावडडे, वडली, सुभाषवाडी, जवखेडे, वराड, बेडी येथील ग्रामपंचायत दप्तराचीही तपासणी करण्याचे आदेश डॉ. आशिया यांनी दिले आहेत.

दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्यावरून ग्रामसेवकांना निलंबीत केल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Exit mobile version