Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बस खाली आल्याने वृध्देचा जागीच मृत्यू: बस स्थानकातील दुर्घटना

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बस स्थानकात चालक रिव्हर्स घेत असतांना बसच्या खाली आल्याने वृध्दा ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

याबाबत वृत्त असे की आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एमएच १४ : बीटी ५६४ क्रमांकाची मनमाड ते भुसावळ ही बस स्थानकात आली. याप्रसंगी वाहक गाडी रिव्हर्स घेत असतांना देवकाबाई नारायण सपकाळे (वय अंदाजे ६०) ही गाडीच्या चाकाखाली आली. यामुळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जिल्हापेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक विलास शेंडे हे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरू होते.

Exit mobile version