Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विकासकामांच्या निधीवरून नगरसेवक व नगरसेविका पतीमध्ये हमरातुमरी !

जळगाव प्रतिनिधी । नियोजन मंडळाने मंजूर केलेल्या निधीतून कामांबाबत भाजपचे नगरसेवक आणि नगरसेविका पतींमध्ये हमरातुमरी झाली आहे. गेल्या आठवड्यात याच प्रकारानंतर पुन्हा ही घटना घडल्याने भाजपमधील अंतर्गत कलह वाढल्याचे दिसून येत आहे.

याबाबत माहिती अशी की, गेल्या आठवड्यातच भाजपचे गटनेते भगत बालाणी आणि नगरसेविकेची पती भरत सपकाळे यांच्यात वाद झाला होता. यानंतर आता नगरसेवक चंद्रशेखर पाटील आणि नगरसेविका सौ. प्रतीभा पाटील यांचे पती वसंत पाटील यांच्यात शुक्रवारी महापौरांच्या दालनामध्ये वाद झाला.

नगरोत्थान योजनेतंर्गत मुलभूत विकास कामांसाठी राज्य शासनाने महापालिकेला निधी मंजूर केला आहे. यात प्रभाग क्रमांक ८मध्ये दीड कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. भाजपचे नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी शासनस्तरावर प्रयत्न केल्यानंतर हा निधी मंजूर झाल्याचे सांगीतले जाते. या निधीतून डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी विकास कामांचे नियोजन केले आहे. तर, निधी विशिष्ट भागातच खर्च होत असल्याने नगरसेविका प्रतिभा पाटील यांचे पती सुधीर पाटील यांनी काही निधी निमखेडी भागात खर्च करण्याची सूचना केली; परंतु आपण प्रयत्न करून मिळवलेल्या निधीचे संपूर्ण नियोजन स्वत: करणार असल्याचा पवित्रा डॉ. पाटील यांनी घेतल्याने दोघांत शाब्दीक चकमक झाली. यामुळे भाजपमध्ये सारेच काही आलबेल नसल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version