Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नोकरी देण्याच्या नावाने तरूणाची फसवणूक

FIR

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एका कंपनीत नोकरीला लाऊन देतो म्हणून जळगावातील तरूणाची दोन लाख रूपयात फसवणूक करण्यात आली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, जळगावातील गायत्रीनगरातील रहिवासी प्रमोद दिनकर इंगळे यांना ‘मॉलकेअर मी ट्रेड स्टोअर’ या वेबसाईटवरील लिंकमध्ये जॉब बाबतची माहिती दिसून आली. यात इंगळे यांना पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळेल असे सांगण्यात आले. या कामासाठी त्यांना पैसे भरण्याचे सांगण्यात आले. याबाबत त्यांच्या मोबाईलवर तीन जणांनी संपर्क साधला.

या तिन्ही इसमांनी सांगितल्यानुसार प्रमोद इंगळे यांनी त्यांच्या अकाऊंटवर २ लाख ३ हजार ५०० रूपये भरले. यानंतर मात्र त्यांनी संपर्क टाळला. यामुळे या प्रकरणात इंगळे यांना आपली फसवूक झाल्याचे लक्षात आले. या अनुषंगाने त्यांनी एमआयडीसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून यानुसार तीन अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय रवींद्र गिरासे हे करत आहेत.

Exit mobile version