Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहरून्नीसा प्रवेशद्वाराला भाजपचा विरोध; प्रस्ताव बारगळला ( व्हिडीओ)

 

जळगाव राहूल शिरसाळे । शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाला लागून ममता हॉस्पीटलजवळ प्रवेशद्वार उभारून त्याला मेहरून्नीसा गेट असे देण्याचा प्रस्ताव आजच्या महासभेत नामंजूर करण्यात आला. सत्ताधार्‍यांनी याला विरोध केला असला तरी शिवसेना व एमआयएमने याचे समर्थन केले आहे.

आजच्या महासभेत बहुतांश विषय सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले. मात्र यातील ममता हॉस्पीटलजवळ मेहरूण गाव हे वारसा असणार्‍या मेहरून्नीसा यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्याचा एमआयएमचे गटनेते जाकीर बागवान यांचा प्रस्ताव मात्र स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या विरोधामुळे फेटाळण्यात आला. घुगे पाटील म्हणाले की, मेहरूणची ओळख पुसुन टाकण्याचा हा प्रयत्न असून मेहरून्नीसा वगळता कोणतेही नाव दिले तर आमचा याला विरोध नाही. तर, माजी महापौर नितीन लढ्ढा आणि एमआयएमचे गटनेते जाकीर बागवान यांनी या प्रकरणी भाजपवर कडाडून टीका केली.

नितीन लढ्ढा पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मेहरूणची ओळख ही मेहरून्नीसा यांच्या नावावरून आहे. आधी या गावाचे मेहरून्नीसा नाव होते. काळाच्या ओघात याचा मेहरूण असा अपभ्रंश झाला आहे. तर, फक्त प्रवेशद्वाराचा विषय असतांनाही भाजपच्या सदस्यांनी संकुचीत विचारसरणीमुळे याला विरोध केल्याचा आरोप लढ्ढा यांनी केला.

तर, एमआयएमचे गटनेते रियाज  बागवान यांनी राजेंद्र घुगे पाटलांनी आधी इतिहासाचा अभ्यास करावा असा टोला मारला. ते म्हणाले की, शहरात अनेक ठिकाणी प्रवेशद्वारे उभारण्यात आली असून याला विविध महापुरूषांची नावे देण्यात आली आहेत. मात्र मेहरून्नीसा यांच्या नावाला केलेला विरोध हा चुकीचा असल्याचा आरोप बागवान यांनी केला.

खालील व्हिडीओत पहा नितीन लढ्ढा व जाकीर बागवान हे या प्रकरणी नेमके काय म्हणालेत ते ?

Exit mobile version