Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव पीपल्स बँकेच्या चेअरमनपदी अनिकेत पाटील

जळगाव प्रतिनिधी । येथील जळगाव पीपल्स बँकेच्या चेअरमनपदी अनिकेत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी डॉ प्रकाश मांगीलाल कोठारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवारी संचालक मंडळाची पहिली सभा झाली. यात ही निवड करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या जळगाव पीपल्स बँकेच्या निवडणुकीत भालचंद्र पाटील यांच्या पॅनलच्या सर्व जागा अविरोध निवडून आल्या होत्या. यानंतर शुक्रवारी संचालक मंडळाची सभा झाली. यात चेअरमनपदी भालचंद्र पाटील यांचे चिरंजीव अनिकेत पाटील तर डॉ. प्रकाश कोठारी यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली.

याप्रसंगी संचालक भालचंद्र पाटील, चंद्रकांत चौधरी, प्रविण खडके, सुनील पाटील,चंदन अत्तरदे, विलास बोरोले, स्मिता पाटील, सुरेखा चौधरी, सुहास महाजन, राजेश परमार, रामेश्‍वर जाखेटे, ज्ञानेश्‍वर मोराणकर, पोलिस पाटील प्रभाकर पाटील, दिलीप कोल्हे, भालचंद्र चौधरी, रजनीकांत काळे, अरुण मराठे, ज्ञानदेव नेमाडे, गिरीधर जावळे आदी उपस्थित होते.

जळगाव पीपल्सचे मावळते चेअरमन भालचंद्र पाटील यांनी सलग १५ वर्षे सर्वाधिक काळ बँकेचे चेअरमनपद भूषविले आहे. दी मल्टिस्टेट को ऑप सोसायटीज क्ट २००२ नुसार दोन कालावधी पेक्षा जास्त चेअरमनपदी राहू शकत नसल्याने बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचे नेतृत्व सर्वानुमते त्यांचे पुत्र अनिकेत पाटील यांच्याकडे सोपवले आहे. अनिकेत पाटील हे केमिकल इंजिनिअर असून ते व्हेगा केमिकल्स प्रा.लि. चे संचालक म्हणून देखील काम बघतात.

Exit mobile version