Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विजेच्या जोडणीसाठी लाच; तंत्रज्ञ व वायरमन एसीबीच्या जाळ्यात !

जळगाव प्रतिनिधी । शेतकर्‍याकडून त्याच्या हॉटेलमध्ये वीजेची जोडणी करण्यासाठी सहा हजारांची लाच स्वीकारतांना वीज वितरण कंपनीचा तंत्रज्ञ आणि कंत्राटी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, तक्रारदार यांचे अमोदा खुर्द ता.जि.जळगाव या ठिकाणी स्वतःच्या शेतामध्ये हॉटेल असुन सदर ठिकाणी विज कनेक्शन मिळणेबाबत म.रा.वि.वि.कंपनी कार्यालय, जळगाव येथे अर्ज सादर केलेला होता. यासाठी तक्रारदाराने डिमांड नोट देखील भरलेली होती. मात्र विज कनेक्शन जोडुन देण्यासाठी वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ रविंद्र धनसिंग पाटील आणि कंत्राटी वारयमद प्रल्हाद उत्तम सपकाळे यांनी तक्रारदाराकडे सात हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. चर्चेतून यासाठी सहा हजार रूपये ठरले.

या संदर्भात संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यात दोन्ही संशयितांना पंचासमक्ष सहा हजार रूपये स्वीकारतांना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. यानंतर रविंद्र धनसिंग पाटील, (वय-४७, व्यवसाय- वरीष्ठ तंत्रज्ञ, म.रा.वि.वि.कंपनी मर्यादीत सबस्टेशन विदगाव. रा.फुपनगरी, ता.जि.जळगाव.
ह.मु.- एमएसईबी कॉलनी, जळगाव) आणि प्रल्हाद उत्तम सपकाळे, (वय-४१, कंत्राटी वायरमन, रा.विदगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

एसीबीचे डीवायएसपी गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, मपोहेकॉ.शैला धनगर, पोना. मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्‍वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Exit mobile version