Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात ६४ नवीन कोरोना बाधीत; रूग्णसंख्येत वाढ सुरूच

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गत २४ तासांमध्ये ६४ नवीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाच्या संसर्गाची वाढ कायम असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची रूग्ण संख्या ही वाढीस लागल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने दिवसभरात ६४ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत जिल्ह्यातील ४३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यातील समाधानाची बाब म्हणजे गत २४ तासांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही.

दरम्यान, दिवसभरातील रूग्णांचा विचार केला असता सर्वाधीक २५ पेशंट हे जळगाव शहरातील आहेत. यामुळे शहरातील रूग्ण संख्या वाढली असून हा चिंतेचा विषय मानला जात आहे. याच्या खालोखाल ११ रूग्ण हे भुसावळ तालुक्यातील आहेत. तर अमळनेर, धरणगाव, एरंडोल व बोदवड या तालुक्यांमध्ये दिवसभरात एकही रूग्ण आढळून आलेला नाही.

Exit mobile version