Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जळगावात आगमन ( व्हिडीओ )

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज एक दिवसाच्या जिल्हा दौर्‍यावर आगमन झाले आहे.

खासदार शरद पवार हे आज एक दिवसाच्या जिल्हा दौर्‍यावर जळगावात दाखल झाले आहेत. सकाळी साडेनऊच्या सुमारास विमानाने खासदार पवार जळगावात आले. विमानतळावर महापौर जयश्रीताई महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, कल्पनाताई पाटील, मंगला पाटील आदींनी शरद पवार यांचे स्वागत केले. नंतर जिल्हा कार्यालयात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दरम्यान, यानंतर त्यांच्या उपस्थितीत धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे दिवंगत माजी आमदार मुरलीधरअण्णा पवार यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. तर यानंतर दुपारी चार वाजता शिवतीर्थ मैदानावर आयोजीत करण्यात आलेल्या लोकसंघर्ष मोर्च्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, खासदार शरद पवार यांच्या सोबत आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सार्वजनीक बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणे, जैन समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, जिल्हा राष्ट्रवादीचे निरिक्षक अविनाश आदीक, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आदींसह अन्य मान्यवर देखील चांदसर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

खालील व्हिडीओत पहा जिल्हा कार्यालयाजवळ खासदार पवार यांचे करण्यात आलेले जंगी स्वागत.

Exit mobile version