Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारू पाजून केला ‘त्या’ तरूणाचा गेम : दोघांची कसून चौकशी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ रात्री उशीरा झालेल्या खून प्रकरणात संबंधीत तरूणाला दारू पाजून मग त्याची क्रूर हत्या करण्यात आल्याचे समोर आले असून या प्रकरणी दोघांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

जळगाव शहरात तरूणाचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडालेली आहे. मयत तरूण अनिकेत गणेश गायकवाड (रा. राजमालती नगर, जळगाव) असल्याची माहिती मिळाली. यानुसार पोलिसांनी या तरूणाच्या कुटुंबियांना पहाटे अडीच वाजता याबाबतची माहिती दिली. मयत तरूणाच्या वडिलांनी आपल्या मुलाचे पार्थिव ओळखले. यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदन झाल्यानंतर आज मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

दरम्यान, शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. खून झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. यामुळे खून करण्यापूर्वी मयत अनिकेत गणेश गायकवाड याला मारेकर्‍यांनी दारू पाजून मग त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच खूनी हे मयत तरूणाच्या परिचयातील असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या खून प्रकरणातील आरोपी लवकरच निष्पन्न होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी Live Trends Newsला दिली आहे. तर, या खुनातील नेमके कारण देखील पोलीस तपासातून लवकरच समोर येणार असल्याचे अधोरेखीत झाले आह

Exit mobile version