Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा. उन्मेष पाटील घेणार एकाच दिवसात तब्बल ११ बैठका !

जळगाव Jalgaon-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार उन्मेषदादा पाटील (MP Unmesh Patil Jalgaon ) हे उद्या एकाच दिवशी विविध ११ विभागांच्या बैठका घेणार आहेत.

खासदार उन्मेषदादा पाटील हे उद्या दिनांक २ मार्च रोजी तब्बल ११ बैठका घेणार आहेत. यात ते सकाळी अकरा वाजता ते महापालिकेत आढावा बैठक घेणार आहेत. त्यांनी अलीकडेच महापालिकेत बैठक घेऊन विविध प्रश्‍नांना मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. यानंतर ते पुन्हा एकदा बैठक घेत असल्याची बाब लक्षणीय आहे. यानंतर दुपारी एक वाजता अजिंठा विश्रामगृहात पाणी पुरवठा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अशा दोन स्वतंत्र बैठका घेण्यात येणार आहेत. तर दोन वाजता विमान प्राधिकरणाची बैठक होणार आहे.

यानंतर जिल्हा नियोजन भवनात महावितरण ( सौर फिडर आणि शेतकर्‍यांच्या समस्या ); कृषी विभाग ( विविध योजना); लीड बँक ( कर्ज प्रकरणे आणि विविध योजना) : महसूल (पोट खराब आणि इतर हक्कांच्या नोटीस संदर्भात) ; औद्योगीक वसाहतीमधील नवीन इएसआय हॉस्पीटल, कढोली आणि दापोरा येथील नवीन औद्योगीक वसाहती आणि उद्योजकांच्या समस्या); पीक विमा कंपनी आणि शेतकर्‍यांंचे प्रश्‍न तसेच नगरदेवळा येथील नियोजीत लॉजीस्टीक पार्कसाठी जमीन हस्तांतरण आदी विविध विषयांबाबत एका पाठोपाठ एक अशा बैठका होणार असल्याची माहिती खासदार उन्मेषदादा पाटील यांच्यातर्फे देण्यात आली आहे.

Exit mobile version