Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पर्यायी मार्ग खुला करा, नाही तर माझ्याशी गाठ आहे ! : खा. उन्मेष पाटील

जळगाव प्रतिनिधी | भातखंडे येथील अंडरपासचे काम सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याची दखल घेऊन खासदार उन्मेष पाटील यांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांना धारेवर धरत पर्यायी मार्ग उपलब्ध करण्याची मागणी केली.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथील अंडरपास आरयूबी बाबत मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गैरसोय होत होती. या आरयुबी मुळे ओझर येथील आठ हजार, अंतूर्ली परिसरातील सहा हजार, भातखंडे भागातील आठ हजार असे सुमारे २५ हजार नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता.सुमारे २५ हजार नागरिक दैनदिन प्रवासाबद्दल हैराण झाले होते. भातखंडे, ओझर , अंतूर्ली या ग्रामस्थ यांचा संपर्क पाचोरा शहरापासून गेल्या बारा महिन्यांपासून तुटला होता.

या सर्व नागरिकांना अडीअडचणी व वैद्यकीय उपचारावेळी २० किलोमीटरचा काकण बर्डी मार्गे मोठा फेर्‍याने प्रवास करत आहे. त्यात पाणी पावसाचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैसा खर्च होत असल्याने या सर्व नागरिकांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्याकडे या आमच्या आर यु बी अंडरपास बाबत असलेला घोळ प्रत्यक्ष भेटून कथन केला होता.

या अनुषंगाने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रेल्वे अभियंता नरवाडे व बांधकामावरील ठेकेदार यांची कानउघाडणी केली. मंडल रेल प्रबंधक कार्यालयातील वरिष्ठ अभियंता दंटोतीया यांच्याशी चर्चा करीत तातडीने या आर यु बी अंडरपास बाबत असलेल्या अडीअडचणी यांची चौकशी करून हा मार्ग व पर्यायी मार्ग तातडीने जनतेला खुला करावा अन्यथा माझ्याशी गाठ आहे. असा दम रेल्वे प्रशासनाला भरला. अन्यथा संबंधितावर कारवाई करण्याची धमकी दिली.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप पाटील, आबा मिस्तरी यांच्यासह गावकरी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version