Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नगरसेविकेच्या नावाने आधारकार्ड अपडेट करणारे पोलिसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । नगरसेविकेच्या नावाचा बनावट शिक्का तयार करून आधार कार्ड अपडेट करणार्‍या दोघांना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगावच्या महिला नगरसेविकेच्या नावाने बनावट स्टँप तयार करून सेतू कार्यालयात आधार कार्ड अपडेशन करण्यात येत असल्याची माहिती विद्यमान नगरसेवक प्रशांत नाईक यांना मिळाली होती. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची खातरजमा करून आज हे काम करणार्‍या सेतूच्या दोन कर्मचार्‍यांना शहर पोलीस स्थानकाच्या ताब्यात दिले आहे.

पोलिसांनी या दोन्ही कर्मचार्‍यांनी कसून चौकशी सुरू केली असून यानंतर गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, हा प्रकार अतिशय गंभीर असून याच्या मागे कोणते रॅकेट असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात पोलीस लवकरच सविस्तर माहिती देणार आहेत. दरम्यान, नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह इतर मंडळी शहर पोलीस स्थानकात उपस्थित आहे.

Exit mobile version