Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात उद्या वंचित बहुजन आघाडीचा महामेळावा

now rahuls congress became a hinduvadi party ambedkar 730X365

जळगाव- वंचित बहुजन आघाडीने राज्यभर लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराच्या तयारीने जोर पकडला आहे. आघाडीच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार अंजली बाविस्कर आणि रावेर लोकसभेचे उमेदवार नितीन कांडेलकर यांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवारी २२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता येथील शिवतीर्थ मैदानावर बहुजन वंचित आघाडीचा सत्ता संपादन महामेळावा होत आहे. वंचित आघाडीचे प्रणेते अँड.बाळासाहेब आंबेडकर, एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असदुद्दीन ओवेसी, औरंगाबादचे आ.इम्तियाज जलील, मुंबईमधील भायखेळयाचे आ.वारीस पठाण, भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, माजी मंत्री दशरथ भांडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश नेते महासभेप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी व वंचित समाजाच्या मतदारांना सभेपर्यंत आणण्याच्या उपाययोजना व संकल्प करून अभूतपूर्व तसेच रेकॉर्डब्रेक सभेची नोंद होईल असा निर्धार भारिप व एमआयएम या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. वंचित आघाडीच्या महासभेला सुमारे लाखाचा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून सभा यश्वस्वीतेसाठी कोअर कमिटी स्थापन करण्यात येऊन विविध समित्या सुद्धा कार्यरत झाल्या आहेत.

जिल्हा निरीक्षक शरद वसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारिपचे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, रावेर लोकसभा अध्यक्ष विनोद सोनवणे, कोअर कमिटी अध्यक्ष नेते मुकुंद सपकाळे, सचिव विवेक ठाकरे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष सुजाता ठाकूर, महानगर महिला अध्यक्षा कविता सपकाळे, एमआयएमचे रेयानभाई, जिया बागवान, हाजी शेख युसूफ, जिल्हा उपाध्यक्ष भारत ससाणे, महासचिव गमिर शेख, रवी ब्राह्मणे, युवक जिल्हाध्यक्ष अबू भालेराव, महानगर अध्यक्ष जितू केदार, महानगर महासचिव अनुप पानपाटील, महानगराध्यक्ष गिरीष नेहते, जिल्हयाचे महासचिव अक्षय जोशी, वैभव शिरतुरे, महानगर संघटक गणेश महाले, महानगर महासचिव हेमंत सुरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष डिगंबर सोनवणे,राहुल सुरवाडे,चाळीसगाव तालुकाध्यक्ष संभा जाधव, अमळनेर तालुकाध्यक्ष दाजीबा गव्हाणे, सचिन अडकमोल, युवराज जाधव, अविनाश नगराळे, अभिजित रंधे, दाजीबा गव्हाणे, पुनमचंद निकम, गौतम पवार, सचिन सुरवाडे, अतुल इंगळे, ज्ञानेश्वर पाटील, आप्पा सावळे, अनिल लोंढे, गोलू केदार, सुनिल सुरळकर, महेंद्र खेडकर, रमेश मगर, अजित शेख, रवींद्र वाघ, रवींद्र साठे, राजेंद्र गोहिल, नरेंद्र निकुंभ सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी आदी परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version