Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील मेहरूण परिसरातून पाच गायींसह १४१ गुरे एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुना मेहरुण, पिरजादे वाडा येथे आणुन ठेवलेल्या ५ गायींसह १४१ गुरांना आरसीपी प्लाटून लावून वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. बकरी ईदचा सण काही दिवसांवर येवुन ठेपला असतांना पोलिस दलाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत असून गुर आणणाऱ्याचा शोध घेवुन त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे एमआयडीसी पेालिसांनी कळवले आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, जुना मेहरुण, पिरजादे वाडा या भागात मोठ्या प्रमाणावर कत्तलीसाठी गुर आणल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना मिळाली होती. अप्पर पेालिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन वरीष्ठ पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांच्यासह उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसींग पाटील, जितेंद्र राजपुत, विजय नेरकर, इम्रान सैय्यद, महेंद्र पाटील मुद्दसर काझी यांच्यासह महिला कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान अशांसह कमांडेा वेशातील आरसीपी जवानांची विशेष तुकडी असा फौजफाटा सकाळीच ७ वाजता मेहरुण परीसरात दाखल झाला. जुना मेहरुणच्या दत्तनगर परीसरातील अरुंद गल्ल्यांमधुन पोलिस ताफा शिरला संपुर्ण परीसराला पेालिसांनी वेढा देत मोकळ्या जागेत आणि रहिवाश्यांच्या अंगणात बांधलेली बैल, गोऱ्हे आणि ५ गायी असे एकुण १४१ जुनावरे पेालिसांनी ताब्यात घेतली. हि जनावरे कत्तलीसाठी आणली असल्याची गुप्त माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यावरुन हि कारवाई करण्यात आली असून उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांच्या देखरेखीत सर्व जनावरांना कुसूंबा गोशाळेत रवाना करण्यात आले असून जनावरांचे मुळ मालकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जनावरांमध्ये दुध व्यवसायीक, शेतकरी असल्याचे पुरावे देणाऱ्यांची जनावरे परत करण्यात येणार असून त्या व्यतीरीक्त जनावरे आणणाऱ्यांचा शोध घेवुन त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निरीक्षक लोकरे यांनी सांगीतले.

Exit mobile version