Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : ब्राऊन शुगर प्रकरणातील म्होरक्या देखील अटकेत

जळगाव प्रतिनिधी | काल रावेर येथून एका महिलेस एक कोटी रूपयांच्या ब्राऊन शुगरसह ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला देखील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यामुळे अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट खुलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने रावेर पोलीस आणि महसूल खात्याच्या मदतीने काल रावेर येथे मोठी कारवाई केली होती. याच्या अंतर्गत रावेरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अख्तरी बानो पिता अब्दुल रऊफ (वय ४५ रा.मोमीनपुरा बडा कमेलापास ता.जि. बर्‍हाणपुर) हिला अटक करण्यात आली. तिच्याकडून एक कोटी आठ हजार रूपये मूल्य असणारे ५००.४ ग्रॅम हेरॉईनचे दोन कीट जप्त करण्यात आले होते. या महिलेची चौकशी केली असता तिने हा माल मध्यप्रदेशातील मंदसौर येथील सलीम खान शेर बहादूर याचा असल्याचे सांगितले होते. या संदर्भातील सविस्तर वृत्तांत आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवर येथे क्लिक करून वाचू शकतात.

या महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. एलसीबीचे एक पथक तातडीने मध्यप्रदेशात रवाना झाले. या पथकाने रात्री उशीरा सलीम खान शेर बहादूर याला अटक केली आहे. यामुळे आता ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात आला असून परिणामी यातील रॅकेट उघड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आरोपीला घेऊन पोलिसांचे पथक आज पहाटे आले असून त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या सहकार्‍याने केली.

Exit mobile version