Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्यास अटक

crime newss 1

जळगाव प्रतिनिधी । मेहरूण आणि तांबापूरा परीसरातील खदानीजवळ अवैधरित्या धारदार शस्त्र (लोखंडी कुकरी) हातात घेवून फिरणाऱ्या तरूणास एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातील कुकरी हस्तगत केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संशयित आरोपी शंकर सुधाकर गायकवाड (वय-32) रा. गौतमनगर तांबापूरा हा मेहरूण व तांबापूरा येथील खदानीजवळ अवैधरित्या लोखंडी कुकरी हातात घेवून दहशत निर्माण करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाल्यानंतर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, नितीन पाटील, पोकॉ मुकेश पाटील, होमगार्ड ईश्वर पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयितास अटक करून त्याच्या ताब्यातील लोखंडी हत्यार हस्त गेली. पोलीस कर्मचारी मुदस्सर नोशाद काझी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसत संशयित आरोपी शंकर गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version