Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेमंड कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर खडसे समर्थकांचे वर्चस्व

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील रेमंड कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या नेतृत्वातील कामगार उत्कर्ष पॅनलने वर्चस्व मिळवले आहे.

येथील रेमंड कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या नेतृत्वातील कामगार उत्कर्ष पॅनलने १० पैकी ८ जागांवर विजय मिळवत वर्चस्व मिळवले. तर माजी महापौर ललित कोल्हे यांच्या नेतृत्वातील खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेच्या सहकार पॅनलला अवघ्या दोन मिळाल्या आहेत. पतसंस्थेत एकूण ६३० सभासद असून,५५१ सदस्यांनी मतदान केले. पतपेढीच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे, जितेंद्र जोशी, परेश कोल्हे यांच्या नेतृत्वातील कामगार उत्कर्ष पॅनल आणि माजी महापौर ललित कोल्हे यांच्या नेतृत्वातील खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेचे सहकार पॅनल या दोन कामगार संघटनांचे पॅनल एकमेकांविरोधात उभे होते. यात कामगार उत्कर्ष पॅनलने बाजी मारली आहे.

सहकार पॅनलमधील सुरेखा चौधरी या महिला राखीव गटातून आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. दरम्यान, कामगार उत्कर्ष पॅनलमधून राजेश जंगले, घनश्याम काळे, चंद्रकांत लोखंडे, रवींद्र पाटील, सतीश पाटील, किरण खडके (इतर मागासवर्गीय), नवल धनगर (भटक्या विमुक्त जमाती), बाबूलाल अहिरे (अनुसूचित जाती -जमाती) निवडून आलेत. तर ललित कोल्हे समर्थक सहकार पॅनलमधून जगदीश बोरोले (जनरल). सुरेखा चौधरी (महिला राखीव, बिनविरोध) हे संचालक म्हणून निवडून आले आहेत.

Exit mobile version