Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यातील अल्प संख्यांकांचा मेळावा (व्हिडीओ)

bhusaval 6

भुसावळ प्रतिनिधी । शहरात अल्प संख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो. अभ्यंकर हे रविवारी शासकीय दौऱ्यानिमित्त आले होते. यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील हायस्कुलमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा मेळावा दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान घेण्यात आला. यानंतर जळगाव जिल्ह्यातील अल्प संख्यांक समाजाचा मेळावा जननाईक फाऊंडेशनतर्फे गनी मेमन यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील अल्प संख्यांक समाजाचा मेळावा दुपारी ४ ते ५.३० वाजेदरम्यान जननाईक फाऊंडेशनतर्फे गनी मेमन यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी मेळाव्यात सुमारे 300 हून जास्त मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदविला होता. समाजातील लोकांनी आपल्या समस्या अभ्यंकर यांच्यासमोर मांडल्या. यावर समाधान पुर्वक अभ्यंकर यांनी मार्गदर्शन करत शासनातर्फे मिळणा-या सर्व योजनांची माहिती दिली. अल्पसंख्यांक समाजाच्या जैन धर्मियांचा सुध्दा मेळावा सुराणा भुवन, मातृभुमि चौकात,
शांतीलालाजी सुराणा यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बंधु-भगिंनी उपस्थित होत्या.

तसेच भुसावळमधील बाजारपेठ पोलीस स्टेशन चौकात ढोल ताशांच्या गजरात शहर प्रमुख निलेश महाजन व कार्यकत्यांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. महिला आघाडी जिल्हा प्रमुख पुनम ब-हाटे, भुरा चव्हाण, हिरा पाटील, लक्ष्मी खरे, भारती गोसावी, प्रतिभा दुसाने यांनी हंबडीकर चौकात अभ्यंकर यांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक सेनेचे अल्पसंख्यांक विभाग व जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख शेख मोहम्मद इलीयास व हाजी मेहमुदत खान, तालुका प्रमुख अतुल शेटे सर, शिवसेना शहर प्रमुख निलेश महाजन, गोकुळ बाविस्कर, योगेश बागुल यांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version