Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वा रे पठ्ठया : भाजप पदाधिकार्‍याने एक लाखाच्या पैजेचा चेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला केला परत !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नेते एकमेकांशी भांड-भांड भांडूनही कधी तरी एकत्र येतात. तर दुसर्‍या तिसर्‍या फळीतील कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर उठल्याची अनेक उदाहरणे आपल्याला माहित असतील. मात्र आ. गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याशी लावलेल्या पैंजेच्या एक लाख रूपयांचा चेक परत करून मनाचा उमदेपणा दाखवून दिला आहे.

माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे पीए आरोग्यदूत अरविंद देशमुख यांनी काल दुपारीच राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा करत यासाठी एक लाख रूपयांची पैंज लावत असल्याचे खुले आव्हान दिले होते. जळगाव येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राहूल पाटील यांनी सोशल मीडियातून हे आव्हान स्वीकारले होते. आज पहाटे लागलेल्या निकालातून भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आल्याने देशमुख यांनी पैंज जिंकली.

दरम्यान, आज दुपारी राहूल पाटील हे एक लाख रूपयांचा चेक घेऊन जी.एम. फाऊंडेशन येथे अरविंद देशमुख यांच्याकडे आले. देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. पाटील यांनी एक लाख रूपयांचा चेकत्यांना दिला. मात्र अरविंद देशमुख यांनी चेकवर दोन क्रॉस मारून तो पुन्हा राहूल पाटील यांच्याकडे दिला. आपण आपला पक्ष आणि नेत्यांच्या आत्मविश्‍वासावर पैंज लावली होती. परमेश्‍वराने मला आवश्यक तितके दिलेले आहे. मला पैसे नकोत, अश शब्दात त्यांनी राहूल पाटील यांना सांगितले. एक लाख रूपयांचा चेक त्यांना परत देऊन त्यांनी राहूल पाटील यांच्याकडू फक्त एक रूपया घेतला.

एकीकडे अनेक कार्यकर्ते हे आपला पक्ष आणि नेत्यांसाठी एकमेकांशी कट्टर दुश्मनी घेत असतांना अरविंद देशमुख यांनी तब्बल एक लाख रूपयांचा चेक परत करून आपला उमदेपणा दाखवून दिला आहे. यामुळे राहूल पाटील भारावल्याचे दिसून आले. हा क्षण भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी डोळ्यात साठवून घेतला.

Exit mobile version