Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सफाई कर्मचारी संघाच्या ‘सफाई काम बंद’ आंदोलनाला जळगाव ग्रामीणचा पाठिंबा

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघ ट्रेड युनियनतर्फे येत्या ९ ऑगस्ट रोजी सफाई काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलना जळगाव जिल्हा ग्रामीण सफाई कर्मचाऱ्यांतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. 

अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघ ट्रेड युनियनराष्ट्रीय अध्यक्ष अशोक वाल्मिकी, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजा जंगले, आनंद जावडेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडवोकेट राजू परमार यांच्या सहमताने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश बारसे, कामगार नेते जयप्रकाश जी चांगरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप अण्णा चांगरे, युवा नेते जितेंद्र अरुण चांगरे, जळगाव महानगर अध्यक्ष कुमत चांगरे, भुसावळ शहर ज्येष्ठ समाजसेवक अशोक जी चुटीले, प्रल्हाद सोनवणे, आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्रीकांत उर्फ अमन रील जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षासह कार्यकर्तांनी दिलीप चांग रे, यांच्या निवासी भेट देऊन, लिखित स्वरूपात, सफाई कर्मचार्यांच्या कल्याणासाठी वाढती बेरोजगारी, जे सरकार आमच्यासोबत मनमानीने इतर गोष्टी करत आहे, अखिल भारतीय सफाई कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन ट्रेड युनियन सोसायटीसाठी जाहिर पाठिंबा दिला आहे.

 

 

Exit mobile version