Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरकुल घोटाळ्याबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

Dhule Court News

जळगाव प्रतिनिधी । घरकुल घोटाळाप्रकरणी धुळे येथील न्यायालयाने आज आपला निकाल घोषीत केला असून हायात असलेल्या सर्व 48 आरोपींना दोषी ठरविले आहे. याबाबत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, मुळ फिर्यादी तथा तत्कालिन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, तपासाधिकारी इशू सिंधू यांनी प्रतिक्रिया दिली.

अखेर सत्याचा विजय- आमदार एकनाथराव खडसे
सुरेश जैन यांनी केलेल्या घोटाळ्यानंतर शिक्षा होण्याच्या भितीने त्यांनी वारंवार सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. मात्र आमचा न्यायदेवतेवर पुर्ण विश्वास होता. न्यायालयाने दिलेल्या निकालाने सत्याचा विजय झाला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री, आमदार एकनाथराव खडसे यांनी केले.

शिक्षा झाल्याने समाधानच – इशू सिंधू
जळगाव न.पा. घरकुल घोटाळ्यातील गुन्ह्यातील केलेला तपासानंतर संशयितांना न्यायालयाकडून शिक्षा होणे ही तपास अधिकाऱ्यासाठी समाधान देणारी बाब आहे. आमच्या सेवेच्या दृष्टीने तपास केलेल्या गुन्ह्यात शिक्षा होणे ही आनंदाची गोष्ट आहेच. तसेच न्यायालयाच्या या निकालामुळे समाजात भ्रष्टाचाराविरोधात चांगला संदेश जाणार आहे.
                       – तपासाधिकारी इशू सिंधू, आयपीएस अधिकारी,

मी घेतलेली भूमिका योग्य- डॉ. गेडाम
मी जळगाव महापालिकेत आयुक्त असतांना सन २००५-०६ मध्ये घरकुल योजने झालेल्या बेकायदेशीरपणा व अनियमततेबाबत जळगाव शहर पोलीसात फिर्याद दिली. त्यावेळी मी घेतलेली भूमिका योग्य होती, हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे सर्वांना शिक्षा झाली याचे समाधान आहे.
                       – डॉ. प्रवीण गेडाम, तत्कालीन मनपा आयुक्त, जळगाव

Exit mobile version