Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

जळगाव प्रतिनिधी । गांधी नगर भागात घरफोडी करून सोने, चांदीचा 7 लाख 66 हजार रुपयांच्या ऐवजासह आरोपीला शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती. आज आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला 18 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, गांधी नगरातील डॉ.रामकृष्ण नेहते यांच्या घरात डल्ला मारून ७ लाख ६६ हजार रूपये किंमतीचा ऐवज लांबविणाऱ्‍या मोनूसिंग जगदीशसिंग बावरी (रा. तांबापुरा) यास शनिवारी शहरातून अटक करण्यात जिल्हापेठ पोलिसांना यश आले होते. त्याच्या ताब्यातील पोलिसांनी ५ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आज न्यायालयात हजर केले असता त्याला 18 सप्टेंबरपर्यंत अशी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुद्देमाल जप्त
ताब्यातील 3 लाख रुपयांची 100 ग्रॅम वजनाची सोन्याची चिफ, 30 हजार रुपयांची 5 ग्रॅम वजनाची कानातले सोन्याचे दोन जोड, 18 हजारांची सोन्याचे सहा ग्रॅम वजनाचे मणी मंगळसुत्र, 75 हजाराची पाच ग्रम वजनाच्या पाच अंगठ्या, 36 हजार रुपयांचे 12 ग्रम वजनाचे सोन्याचे पेडल, 5 हजाराचे सोन्याचे दोन तुकडे प्रत्येकी 1 ग्रम वजनाचे, 12 हजार रुपयांची सोन्याच्या प्रत्येकी दोन ग्रम वजनाच्या दोन अंगठ्या, 5 हजाराची सोन्याच्या प्रत्येकी एक ग्रम वजनाच्या दोन वस्तू, 27 हजारांची 9 ग्रम वजनाची सोन्याची पट्टी, 30 हजार रुपये किंमतीची 1 किलो वजनाचे चांदीचे नाणे आणि 20 हजारांचे चादीचे एक ताट तीन ग्लास दोन वाट्या दोन समया, दोन अत्तरदाण्या, तीन चमचे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

Exit mobile version