Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कंत्राटदाराची फसवणूक : चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल

FIR

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एका शासकीय कंत्राटदाराची सुमारे ४५ लाख रूपयात फसवणूक करण्यात आल्याच्या आरोपातून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लालसिंग हिलालसिंग पाटील (वय ७०, रा. जयनगर) यांची एल. एच. पाटील कन्स्ट्रक्शन प्रा. लि. नावाची फर्म आहे. त्यांनी १० जानेवारी २०१७ रोजी पुणे येथील ग्रॅव्हीटी ग्रुपचे अक्षय ओंकार चोपडे यांना शरसोली व नागदुली शिवारातील शेताच्या शेडचे बांधकाम करण्याचे काम दिले होते. त्यापोटी १३ लाख ७८ हजार रुपयांचा धनादेशही दिला. तो वटवून त्यांनी हे पैसे घेतले होते. यासाठी नाना उखा बोरसे यांनी मध्यस्थी केली होती.

दरम्यान, अक्षय चोपडे याने पैसे घेऊन देखील काम सुरू न केल्याने एल.एच. पाटील यांनी सातत्याने याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिलीत. यामुळे अखेर त्यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. यानुसार अक्षय ओंकार चोपडे, दीपक गंगाराम लांघी व सुयेश गजानन तिटकरे (संचालक, ग्रॅव्हिटी ग्रुप) आणि नाना उखा बोरसे या चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात त्यांनी शासकीय नियमानुसार त्यावरील व्याज व शेडच्या कामाची आजची किंमत असे सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Exit mobile version