Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाजार समित्यांवर अखेर प्रशासकांची नियुक्ती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुदत संपलेल्या जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर अखेर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक २४ एप्रिल २०२१ पासून २३ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतरही संचालक मंडळाला २३ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर आता संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जळगावसह भुसावळ, रावेर, यावल, जामनेर, चोपडा, बोदवड व पारोळा या आठ कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहायक निबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक लवकरच होणार असल्याचे संकेत देखील यातून मिळाले आहेत. सहा महिने किंवा निवडणूक होऊन संचालक मंडळ कार्यरत होई पर्यंत प्रशासक नेमण्याचे सहकार विभागाने आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आठ बाजार समितींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली.

Exit mobile version