ग.स.चे माजी अध्यक्ष व व्यवस्थापक अटकेत

जळगाव प्रतिनिधी | एका लिपिकाची नियमित वेतनश्रेणी करण्यासाठी बेकायदेशीरपणे मागील तारखेचे बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी गस सोसायटीचे माजी अध्यक्ष विलास नेरकर व व्यवस्थापक संजय ठाकरे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, विलास नेरकर अध्यक्ष असताना फेब्रुवारी २०१९मध्ये गस सोसायटीत ३६ लिपिक व २७ शिपायांची भरती झाली आहे. नेरकर अध्यक्षपदावरून गेल्यानंतर संबंधित कर्मचार्‍यांना १९ ऑगस्ट २०१९ रोजी नियमित वेतनश्रेणीचे आदेश पारित झाले. यावेळी मनोजकुमार पाटील अध्यक्ष होते. तत्पूर्वी नेरकर अध्यक्ष नसल्याच्या काळात त्यांनी विजय पाटील या लिपिकाच्या सुधारित वेतनश्रेणीचे बनावट आदेश तयार केले. त्यावर दोघांच्या स्वाक्षरी आहेत. मनोजकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरून नेरकर व ठाकरे या दोघांविरुद्ध ८ फेब्रुवारी २०२१ रोजी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून नेरकर आणि ठाकरे यांनी खूप प्रयत्न केले होते. मात्र यात त्यांना यश आले नाही. काही दिवसांपूवीर्र्च दोघांचे अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळले होते. यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Protected Content