Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वेच्या केंद्रीय प्रवासी सुविधा समितीच्या सदस्यपदी डॉ. राजेंद्र फडके

जळगाव प्रतिनिधी | भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र अशोक फडके यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने प्रवासी सुविधा समितीच्या (पीएसी) सदस्यपदी नियुक्ती केली आहे.

केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संयुक्त सचिव एस.के. अग्रवाल यांनी प्रवासी समिती सदस्यांची नुकतीच घोषणा केली आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र अशोक फडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील रेल्वे स्थानके आणि ट्रेन्समध्ये प्रवाशांना मिळणार्‍या सुविधांबाबत ही समिती पाहणी करणार असून पुरविण्यात आलेल्या सुविधांवर लक्ष ठेवणार आहे. पी. के. कृष्णनदास हे या समितीचे अध्यक्ष असून यातील सदस्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची प्रवासी सुविधा समिती अतिशय महत्वाची असून यातील डॉ. फडके यांचा समावेश हा लक्षणीय असून या माध्यमातून जिल्ह्याला एक महत्वाचे पद मिळाले आहे. डॉ. राजेंद्र फडके यांनी याआधी बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम केले असून त्यांना या समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा केंद्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version