Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्हा काँग्रेस प्रभारीपदी विनायक देशमुख 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांची जळगाव ग्रामीण व जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यासंदर्भात प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे (संघटन व प्रशासन) यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रात नमुद केले आहे की, पक्ष संघटन व भविष्यात होवू घातलेल्या निवडणुका लक्षात घेता प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेनुसार जळगाव शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या प्रभारीपदी आपली नियुक्‍ती करण्यात आली आहे.

देशमुख हे मागील ३२ वर्षे काँग्रेस संघटनेत कार्यरत असून त्यांनी जिल्हा युवक काँग्रेस व जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावर काम केले आहे. प्रदेश सरचिटणीस पदाच्या कार्यकाळात त्यांनी धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे प्रभारी म्हणून काम केले आहे. २०१६ ते २०१९ या कालावधीत त्यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी होती. आता पुन्हा जळगावच्या प्रभारीपदी नियुक्‍ती झाली आहे. काँग्रेस संघटनेत देशमुख कुशल संघटक म्हणून सर्वांना परिचित असून यापूर्वी त्यांच्याकडे नागपूर व लातूर महापालिका निवडणूक निरीक्षक, पालघर लोकसभा निवडणूक निरीक्षक अशा विशेष जबाबदार्‍या देण्यात आल्या होत्या. २०१६ ते २०१९ या काळात काँग्रेस नेते खा.राहूल गांधी यांच्या प्रचार सभांचे नियोजन करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीचे ते सदस्य होते.

या निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी देशमुख यांना शुभेच्छा दिल्यात. जळगाव जिल्ह्यातुन या नियुक्‍तीचे स्वागत होत असून आ.शिरीष चौधरी, खा.डॉ.उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, शहराध्यक्ष शाम तायडे यांनी आनंद व्यक्‍त केला आहे.

Exit mobile version