Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढी संस्थेवर त्वरित प्रशासक नेमावा

जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे शहरातील ग.स.सोसायटीची निवडणूक पुढे ढकलली आहे, त्यामुळे विद्यामान संचालक मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि बोगर नोकर भरती करीत आहे. सहकार विभागाने ग.स.सोसायटीची निवडणूक घेण्यापुर्वी प्रशासक नेमावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रविण जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

ग.स. सोसायटीची पंच वार्षिक निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्याच्या निर्णय सहकार विभागाने घेतला पण आता त्वरित निवडणूक घ्याव्यात व त्याआधी प्रशासन नेमावा विद्यमान संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात बोगस नोकर भरती केली. सर्व विश्वस्थ मंडळाने स्वता : चे नातेवाईक किंवा आपले हित संबंधी – स्वतांचे हित साधून भरती केले आहेत. हे चाळीस 40 सभासदापासून लपून नाही तसेच धनस्वर्थासाठी आपापसात 5 वर्ष चोरावर मोर झालेले विश्वस्थ सर्वश्रूत आहे. आता तर सर्वशाखांमध्ये नवीन फर्निचर बनवण्याचा घाट घालून करोडोंनचा भष्ट्राचार करण्याची तयारी सुरु आहे. 

ठेवींवरचे व्याज कमी केलेत तर स्पेशल कर्जावरील व्याज दरात पण अजून कपात होणे अपेक्षित आहे. जामीन कर्ज मर्यादेत वाढ व्हावी, संचालक मंडळाच्या हुकुमशाही पद्धतीच्या निर्णयामुळे ठेवी कमी होवून कर्ज उचल सुध्दा कमी झाली, म्हणून या पुढेसंचालक मंडळाचा धोरणात्मक निर्णय थांबवून, त्वरित प्रशासकांची नेमणूक होवून पारदर्शी निवडणूक पार पाडवी, अशी भाजपा शिक्षण पदधिकारी प्रविण जाधव, संजय वानखेडे, दुष्यत पाटील, प्रविण धनगर, पांडुरंग पाटील, संदीप घुगे, विजय गिरणारेर, संतोष भावसार, किरण पाटील, एन.आर.दानी यांनी केली आहे.

 

Exit mobile version