Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये देवेश भय्याची निवड

जळगाव प्रतिनिधी | दुबईमध्ये १२ ते २१ डिसेंबरदरम्यान आयोजीत करण्यात आलेल्या इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड या स्पर्धेत जळगावकर देवेश भय्या याची निवड करण्यात आली आहे.

जळगावातील एल.एच. पाटील स्कूलचा विद्यार्थी देवेश भय्या याने आधीच आपल्या कर्तृत्वाची छाप टाकली आहे. यात आता त्याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. देवेशची इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये निवड करण्यात आलेली आहे. यासाठी देशातून फक्त सहा विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात देवेशचा समावेश आहे. महाराष्ट्रातून देवेश हा एकमेव विद्यार्थी आहे. आठवी ते दहावीचे विद्यार्थी यासाठी पात्र असतात. आठवीत असतानाच ही परीक्षा देऊन यशस्वी होणारा देवेश हा देशातील पहिलाच विद्यार्थी आहे.

देवेश हा आर्किटेक्ट पकंज भय्या व इंटेरियर डिझायनर पल्लवी भय्या यांचा पुत्र आहे. त्याला आधीच राष्ट्रपतींच्या हस्ते प्रधानमंत्री बालशक्ती शौर्य पुरस्काराने गौरवले गेले आहे. यानंतर आता तो दुबई येथे होणार्‍या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्याला शाळेचे संचालक जितेंद्र पाटील, कृणाल राजपूत, प्राचार्य शिल्पा मल्हारा यांचे मार्गदर्शन लाभले. तर या निवडीबद्दल याचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

Exit mobile version