Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात ३८ लाखांचा गांजा जप्त ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । भुसावळकडून जळगाव शहराकडे येणार्‍या ट्रकमधून पोलिसांनी तब्बल ३८ लाख १६ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे यांना जळगाव शहरातून एम.एच ४२ टी ९१२५ हा ट्रक गाजांने भरुन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, यांच्यासह एमआयडीसी कर्मचार्‍यांच्या पथकाने महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ माहितीनुसार सापळा रचुन ट्रक अडवला. त्याची तपासणी केली असता, ट्रकमध्ये गांजाने भरलेले पोते मिळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून नेमका गांजा कोणचा, कुठे जात होता याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. दरम्यान, यात तब्बल ३८ लाख १६ हजार रूपयांचा गांजा आढळून आला आहे. गांजा आणि ट्रकसह पोलिसांनी ट्रकचालक मुख्तार रईम पटेल वय २४ रा. लोहारा ता. बाळापुर जि.अकोला यास ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलिस उपधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन, पोलिस निरीक्षक विनायक लोकरे , पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे ,पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे सहायक फौजदार अतुल वंजारी रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, राजेंद्र कांडेलकर, दीपक चौधरी, इम्रान सय्यद, हेमंत कळसकर, सतीश गर्जे, हेमंत पाटील, सचिन पाटील, गोविंदा पाटील, विजय बावस्कर, निलेश पाटील, मुकेश पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापु रोहम, राजेंद्र मेढे प्रमोद लाड वंजारी, चालक धनगर भूषण सोनार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

खालील व्हिडीओत पहा गांजा जप्त करण्याच्या कारवाईचा व्हिडीओ.

Exit mobile version