Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी : भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडकेत जखमी झालेल्या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, २९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता शिव कॉलनी स्टॉपवर विजय शांताराम पाटील वय-33 रा.बंगाली फाईल, अमळनेर यांचा अपघात झाला होता. या तरुणावर २२ दिवस उपचार सुरू होते.
रात्री जळगावहुन तळई जाणाऱ्या एसटी बसने (एमएच ०६ एस ८६२३) विजय पाटील याच्या दुचाकीस (एमएच १९ सीजी ४१६२) धडक दिली होती. यात विजय गंभीर जखमी झाला असून तो बेशुद्ध झाला होता. नागरीकांनी त्याला बेशुद्ध अवस्थेतच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, जळगाव आगाराच्या प्रमुख निलीमा बागुल यांनी या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दुचाकीचालक विजय पाटील विरुद्ध तक्रार दिली होती. विजय पाटील या दुचाकी भरधाव चालवत असताना एसटी बसवर येऊन आदळला असे तक्रारीत म्हटले होते. परंतू, या अपघातास एसटी बसचालक दोषी असल्याचे चौकशीत समोर आले होते. त्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सतीष डोलारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ७ नोव्हेंबर रोजी एसटीचालक चंद्रकांत ईश्वर पाटील (रा.पिंपळकोठा, ता.एरंडोल) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर विजय याच्यावर खासगी रुग्णालयता उपचार सुरू असताना बुधवारी त्याचा मृत्यू झाला. यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. पोहेकॉ चंद्रकांत डोलारे तपास करीत आहेत.

Exit mobile version