Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लवाद नेमण्याला भाजपचा विरोध

जळगाव प्रतिनिधी । वॉटरग्रेस कंपनीसोबतच्या वादांचा निपटारा करण्यासाठी लवाद नेमण्याचा प्रस्ताव आजच्या महासभेत येणार असून भाजपने याला विरोध केला आहे. याबाबत गटनेते भगत बालाणी यांनी पत्र लिहले आहे.

याबाबत वृत्त असे की, महापालिकेने शहरातील साफसफाईसाठी वॉटर ग्रेस कंपनीसोबत करारनामा केला आहे. या करारनाम्यात महापालिका व मक्तेदार यांच्यात वाद झाल्यास आयुक्त हे लवाद म्हणून काम पाहतील असा निर्णय झाला आहे; परंतु मक्तेदाराने आयुक्तांना लवाद म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पालिका व मक्तेदारातील वाद सोडवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आजच्या महासभेत सादर केला आहे.

या प्रस्तावाला विरोध दर्शवत भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी महापौरांना पत्र दिले आहे. त्यात घनकचरा व्यवस्थापनाबाबत सभागृहाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. करारनामा करण्यापूर्वी तो महासभेत कधीच आणला नव्हता. त्यामुळे करारनाम्यात प्रशासनाकडून काही चुका असल्यास त्याला प्रशासन हेच जबाबदार असल्याचे बालाणी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लवाद नियुक्तीचा विषय महासभेत सादर करण्याची गरज नव्हती. प्रशासनाने आपल्या स्तरावर पालिकेचे आर्थिक हित जोपासण्याचा निर्णय घ्यावा, असे पत्रात म्हटले आहे.

Exit mobile version