Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात कोरोनाचा स्फोट; एकाच दिवशी २२६ रूग्ण; जिल्ह्यात ८५८ पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यात आज एकाच दिवशी तब्बल २२६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात आज ८५८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून आजवरची ही एकाच दिवसातील दुसरी सर्वोच रूग्ण संख्या ठरली आहे.

आज सायंकाळी आलेल्य रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्लब ८५८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात जामनेरात एकाच दिवशी तब्बल २२६ रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे तेथे कोरोनाचा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता रूग्णसंख्या पुढील प्रमाणे आहे. जळगाव शहर-९४; जळगाव तालुका-२९; भुसावळ-८१; अमळनेर-१; चोपडा-४९; पाचोरा-२५; भडगाव-२४; धरणगाव-४०; यावल-१९; एरंडोल-९९; रावेर-२०; पारोळा-५४; चाळीसगाव-६४; मुक्ताईनगर-२३; बोदवड-८ आणि इतर जिल्ह्यातील दोन रूग्णांचा समावेश आहे.

Exit mobile version